Agriculture Admission : कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रमासाठी वाढीव प्रवेश प्रक्रीया सुरु, वाचा संपूर्ण वेळापत्रक
वर्धा : डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापिठ अंतर्गत शैक्षणिक सत्र 2026-27 करीता दोन वर्ष मराठी माध्यम कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रमा करीता प्रवेश प्रक्रिया केंद्रिय ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. इच्छुकांनी 19 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या वाढीव प्रवेश प्रकीयेकरीता पात्रता महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक शालान्त परीक्षा मंडळाची माध्यमिक शालान्त परीक्षा (इ. १०) किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. प्रवेश क्षमता, आरक्षण इत्यादी सविस्तर तपशीलाचा अंतर्भाव असलेली कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रम (दोन वर्ष मराठी माध्यम) प्रवेश माहिती पुस्तिका या संकेतस्थळावर आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख दि. 19 ऑगस्ट आहे. उमेदवाराने प्रवेश माहिती पुस्तीकेचे योग्यरीत्या अवलोकन करावे. तसेच ऑनलाईन अर्ज भरतांना पासपोर्ट आकाराचे सद्याचे छायाचित्र, स्वतःची स्वाक्षरी व मुळ कागदपत्रे स्कॅन करुन संकेतस्थळावर अपलोड करावी. प्रवेश अर्ज संकेतस्थळावर ऑनलाईन सबमीट करुन प्रवेश अर्ज शुल्क डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड, नेट बँकींग किंवा युपीआय व्दारे ऑनलाईनच भरायचे आहे. प्रवेश अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गाकरीता 500 रुपये व आरक्षित प्रवर्गाकरीता 250 रुपये उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे. प्रवेश अर्ज किंवा कागदपत्रे स्वतः, ईतराव्दारे, टपालाने, कुरीयरने कार्यालयाला पाठवु नये. सदर माहिती प्राचार्य, शासकीय कृषि तंत्र विद्यालय, सेलसुरा जि. वर्धा यांचेतर्फे देण्यात येत आहे. प्रवेश अर्ज दाखल करतेवेळी ज्या विद्यार्थ्यांना शासकीय कृषि तंत्र विद्यालय, सेलसुरा येथे प्रवेश घ्यावयाचा आहे त्या विद्यार्थ्यांनी शासकीय कृषि तंत्र विद्यालय, सेलसुरा विद्यालयाचा सांकेतीक कोड १२०३ हा नमुद करावा, असे शासकीय कृषि तंत्र विद्यालयाच्या प्राचार्यांनी कळविले आहे. एल निनोचा प्रभाव वाढतो आहे, ऑगस्टचा शेवटचा आठवडा आणि संपूर्ण सप्टेंबर महिना पाऊस कसा राहील?

📌 **महत्त्वाच्या घडामोडी**: • Agriculture Admission : कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रमासाठी वाढीव प्रवेश प्रक्रीया सुरु, वाचा संपूर्ण वेळापत्रक संदर्भात लेटेस्ट अपडेट समोर आले आहेत. • जाणून घ्या आजच्या ताज्या बातम्या व विशेष रिपोर्ट. 📖 **सविस्तर वृत्त**: आज Agriculture Admission : कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रमासाठी वाढीव प्रवेश प्रक्रीया सुरु, वाचा संपूर्ण वेळापत्रक विषयी महत्त्वाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी यावर भाष्य केले आहे. ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी टॉली न्यूज पाहत रहा.

