tolee
India & National Affairs
Tolee NewsIndia & National Affairs

BJP Yuva Morcha : ‘वंदे मातरम्’च्या अवमानाच्या निषेधार्थ भाजयुमो मुंबईचे जोरदार आंदोलन

मुंबई : १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी ‘वंदे मातरम्’ सुरू असताना राष्ट्रीय गीताचा अनादर केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो), मुंबईच्या वतीने शहरातील सहाही जिल्ह्यांमध्ये तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन भाजप मुंबई अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांच्या मार्गदर्शनाखाली, तर भाजयुमो मुंबई अध्यक्ष दीपक सिंह यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले. (BJP Yuva Morcha) दादरमध्ये कार्यकर्त्यांचे आंदोलन : याच पार्श्वभूमीवर दादर पूर्व येथील श्री स्वामीनारायण मंदिरासमोरही भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी सामूहिकरित्या ‘वंदे मातरम्’चे गायन करत राष्ट्रीय गीताच्या सन्मानाचे आणि राष्ट्रीय स्वाभिमानाचे रक्षण करण्याचा संकल्प केला. काँग्रेस नेत्यांच्या कृतीविरोधात भाजयुमो कार्यकर्त्यांनी लोकशाही मार्गाने तीव्र निषेध नोंदवला. (BJP Yuva Morcha) ‘राष्ट्रीय भावनांचा अपमान सहन करणार नाही’ : भाजयुमो मुंबई अध्यक्ष दीपक सिंह यांनी यावेळी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधाच्या राजकारणात काँग्रेस आता राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’च्या कथित अवमानापर्यंत पोहोचली आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी ‘वंदे मातरम्’चा केलेला अनादर हा देशातील कोट्यवधी नागरिकांच्या राष्ट्रीय भावनांचा अपमान आहे.” (BJP Yuva Morcha) ‘वंदे मातरम्’ने स्वातंत्र्यलढ्यात लाखो देशभक्तांच्या मनात राष्ट्रभक्तीची भावना जागृत केली. ब्रिटिश सत्तेच्या काळात हे गीत गाताना अनेक स्वातंत्र्यसैनिकांना लाठीमार आणि तुरुंगवास सहन करावा लागला, मात्र त्यांनी राष्ट्रभक्तीची भावना सोडली नाही, असेही सिंह यांनी नमूद केले. (BJP Yuva Morcha) ‘राजकीय विरोधालाही मर्यादा असते’ : राजकीय मतभेद असले तरी राष्ट्रीय भावना आणि देशाच्या गौरवाशी संबंधित विषयांवर राजकारण करू नये, असे आवाहन करत दीपक सिंह म्हणाले की, “राजकीय विरोधालाही एक मर्यादा असते. राजकीय स्वार्थासाठी राष्ट्राचा गौरव आणि राष्ट्रीय भावनांशी खेळ करणे देश कदापि स्वीकारणार नाही.” (BJP Yuva Morcha) ‘वंदे मातरम्’च्या सन्मानासाठी भाजयुमो मुंबई भविष्यातही ठामपणे उभा राहील. राष्ट्रीय भावना आणि देशाच्या गौरवाला ठेच पोहोचविणाऱ्या कोणत्याही मानसिकतेविरोधात लोकशाही मार्गाने संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. या आंदोलनाला भाजयुमो मुंबईचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, मंडल पदाधिकारी, युवा कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. (BJP Yuva Morcha)

S
Suman Kumar@suman_kumar
8/17/2026 | 3:00 am 2 Min Read
Media 1
AI Generated Executive Summary

Latest updates on BJP Yuva Morcha : ‘वंदे मातरम्’च्या अवमानाच्या निषेधार्थ भाजयुमो मुंबईचे जोरदार आंदोलन. Read verified analysis on Tolee News.

📌 **महत्त्वाच्या घडामोडी**: • BJP Yuva Morcha : ‘वंदे मातरम्’च्या अवमानाच्या निषेधार्थ भाजयुमो मुंबईचे जोरदार आंदोलन संदर्भात लेटेस्ट अपडेट समोर आले आहेत. • जाणून घ्या आजच्या ताज्या बातम्या व विशेष रिपोर्ट. 📖 **सविस्तर वृत्त**: आज BJP Yuva Morcha : ‘वंदे मातरम्’च्या अवमानाच्या निषेधार्थ भाजयुमो मुंबईचे जोरदार आंदोलन विषयी महत्त्वाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी यावर भाष्य केले आहे. ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी टॉली न्यूज पाहत रहा.

t/
Published In Community ToleeAI Automation Society
1
U