tolee
India & National Affairs
Tolee NewsIndia & National Affairs

Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...

p style="text-align: justify;"strongDharmendra Pradhan:/strong NEET पेपर लीक (NEET Paper Leak) प्रकरण आणि त्यानंतर झालेल्या विद्यार्थी आंदोलनांवर (Student Protests) भारताचे माजी केंद्रीय शिक्षण मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी अखेर आपलं मौन सोडलं आहे. "आंदोलनादरम्यान काही लोकांनी 'Gen Z' ची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला," असा गंभीर आरोप प्रधान यांनी केला आहे. तसेच, "मंत्रिपद माझ्यासाठी कधीही महत्त्वाचं नव्हतं; मी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती," असा दावाही त्यांनी केला./p p style="text-align: justify;"शिक्षण मंत्री पदावरून हटल्यानंतर दोन आठवड्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचं हे पहिलं वक्तव्य समोर आलं आहे. दिल्लीतील जंतर-मंतरवर (Jantar Mantar) विद्यार्थ्यांच्या वाढत्या आंदोलनानंतर 25 जुलै रोजी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. शनिवारी भुवनेश्वर येथील जीएम युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधताना त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली./p h3 style="text-align: justify;"strongDharmendra Pradhan: 'Gen Z हीच भारताला विश्वगुरू बनवेल'/strong/h3 p style="text-align: justify;"'Gen Z' संदर्भात बोलताना प्रधान म्हणाले, "Gen Z ही आपल्याच देशातील मुले आहेत आणि त्यांच्याशी माझी कोणतीही वैयक्तिक अडचण नाही. भारतामध्ये दरवर्षी सुमारे 2 कोटी मुलांचा जन्म होतो आणि गेल्या 10 वर्षांत सुमारे 20 कोटी मुले जन्माला आली आहेत. या तरुण पिढीच्या स्वतःच्या काही आकांक्षा आहेत आणि हीच पिढी भविष्यात भारताला विश्वगुरू बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल." मंत्रिपदाबाबत बोलताना ते म्हणाले की, माझ्यासाठी पदापेक्षा देशातील तरुणांचे भविष्य आणि जबाबदारी अधिक महत्त्वाची आहे. म्हणूनच मी स्वतःहून पंतप्रधानांकडे राजीनामा सादर केला होता, असे त्यांनी म्हटले. /p h3 style="text-align: justify;"strongDharmendra Pradhan: नवीन पटनाईक आणि BJD वर जोरदार निशाणा/strong/h3 p style="text-align: justify;"रायराखोल येथील एका दुसऱ्या कार्यक्रमादरम्यान धर्मेंद्र प्रधान यांनी ओडिशाचे माजी मुख्यमंत्री आणि बीजेडी (BJD) प्रमुख नवीन पटनाईक (Naveen Patnaik) यांच्यावर तीव्र शब्दात हल्लाबोल केला. विमानतळाबाहेर बीजेडीच्या युवा आणि विद्यार्थी कार्यकर्त्यांनी 'धर्मेंद्र प्रधान गो बॅक'च्या घोषणा देत निदर्शने केली होती./p p style="text-align: justify;"या निदर्शनांवर उत्तर देताना प्रधान म्हणाले, "मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. तुम्ही मला मागे जाण्यास सांगितले, तरीही मी परत येत राहीन. मी ओडिशाच्या जनतेची मान खाली घालावी असे कोणतेही काम केले आहे का?" नवीन पटनाईक मला ओडिशासाठी 'कलंक' आणि वाईट व्यक्ती ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि यासाठी ते तरुणांचा वापर करत राजकीय निदर्शने घडवून आणत आहेत, असा थेट आरोपही त्यांनी केला./p h3 style="text-align: justify;"strongराज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ/strong/h3 p style="text-align: justify;"iframe title="YouTube video player" src=" width="560" height="315" frameborder="0" allowfullscreen="allowfullscreen"/iframe/p p style="text-align: justify;"strongआणखी वाचा /strong/p p class="abp-article-title" style="text-align: justify;"stronga href=" Raut on Abhijeet Dipke: अभिजीत दिपके हळूहळू परिपक्व होतील, संघर्षात हे सहन करावेच लागते; संजय राऊतांचा प्रेमाचा सल्ला/a/strong/p

S
Suman Kumar@suman_kumar
8/9/2026 | 3:26 pm 2 Min Read
Media 1
AI Generated Executive Summary

Latest updates on Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले.... Read verified analysis on Tolee News.

📌 **महत्त्वाच्या घडामोडी**: • Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले... संदर्भात लेटेस्ट अपडेट समोर आले आहेत. • जाणून घ्या आजच्या ताज्या बातम्या व विशेष रिपोर्ट. 📖 **सविस्तर वृत्त**: आज Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले... विषयी महत्त्वाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी यावर भाष्य केले आहे. ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी टॉली न्यूज पाहत रहा.

t/
Published In Community ToleeAI Automation Society
1
U