Duleep Trophy : सरफराज खान टीम इंडियात येताच मोठा ट्विस्ट; 25 वर्षांच्या खेळाडूचं नशीब एका रात्रीत पालटलं, संघात झाली निवड
pstrongJay Gohil to replace Sarfaraz Khan in Duleep Trophy :/strong श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी सरफराज खानला टीम इंडियात स्थान मिळाले आहे. दुखापतग्रस्त साई सुदर्शनच्या जागी सरफराजचा भारतीय संघात समावेश करण्यात आला. मात्र, सरफराजला टीम इंडियाकडून आलेल्या कॉलअपनंतर आता त्याच्या जागेवरही रिप्लेसमेंटची घोषणा करण्यात आली आहे. ही रिप्लेसमेंट दुलीप ट्रॉफीमध्ये वेस्ट झोनच्या संघात करण्यात आली आहे. सरफराज खानला भारतीय संघात स्थान मिळाल्यामुळे वेस्ट झोनच्या संघातील त्याची जागा रिकामी झाली होती. त्यामुळे त्याच्या जागी सौराष्ट्राचा फलंदाज जय गोहिल याला संघात स्थान देण्यात आले आहे./p pstrong25 वर्षीय जय गोहिलची चमकली किस्मत/strong/p pवेस्ट झोनच्या संघात स्टँडबाय खेळाडू म्हणून असलेल्या जय गोहिलला आता सरफराज खानचा रिप्लेसमेंट म्हणून संधी मिळाली आहे. 25 वर्षीय गोहिलने मागील रणजी ट्रॉफी हंगामात सौराष्ट्रासाठी दमदार कामगिरी केली होती. 2025-26 रणजी ट्रॉफी हंगामात गोहिलने सौराष्ट्रासाठी 6 सामन्यांत 58.11च्या सरासरीने 523 धावा केल्या. यामध्ये त्याच्या नावावर एक शतक आणि चार अर्धशतकं आहेत. त्याची सातत्यपूर्ण कामगिरी पाहता दुलीप ट्रॉफीमध्ये त्याला आता मोठी संधी मिळाली आहे. जय गोहिलने आतापर्यंत 12 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने 47.77च्या सरासरीने 860 धावा केल्या आहेत. त्यामुळे सरफराजच्या अनुपस्थितीत वेस्ट झोनसाठी गोहिलकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल./p pstrongवेस्ट झोनमध्ये सौराष्ट्राचे दोन खेळाडू/strong/p pदुलीप ट्रॉफीसाठी वेस्ट झोनच्या संघात सौराष्ट्राचे जय गोहिल हे दुसरे खेळाडू आहेत. त्यांच्याशिवाय यष्टीरक्षक-फलंदाज हार्विक देसाई याचाही वेस्ट झोनच्या संघात समावेश आहे. भावनगरचा असलेल्या हार्विक देसाईने डिसेंबर 2022 मध्ये आसामविरुद्ध सौराष्ट्राकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 2022-23 हंगामात सौराष्ट्राने रणजी ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले, त्या विजयी मोहिमेचाही तो भाग होता./p pstrongसाई सुदर्शनच्या दुखापतीमुळे सरफराजला संधी/strong/p pदरम्यान, 15 ऑगस्टपासून गॉल येथे श्रीलंकेविरुद्ध सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी सरफराज खानला भारतीय संघात स्थान मिळाले आहे. साई सुदर्शनच्या दुखापतीमुळे त्याला संघाबाहेर व्हावे लागले. साई सुदर्शनला गेल्या महिन्यात इंडिया एच्या दौऱ्यादरम्यान पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. सध्या तो बंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये उपचार घेत असून पुनर्वसनाच्या प्रक्रियेत आहे./p pstrongदुलीप ट्रॉफीला 23 ऑगस्टपासून सुरुवात/strong/p pa title="महाराष्ट्र" href=" data-type="interlinkingkeywords"महाराष्ट्र/aाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली वेस्ट झोनचा संघ दुलीप ट्रॉफीच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. वेस्ट झोनचा पहिला सामना 23 ऑगस्ट रोजी बंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये नॉर्थ झोनविरुद्ध होणार आहे. /p pstrongहे ही वाचा -/strong/p pa href=" Ganguly : आधी पत्र आलं... मग थेट जीवे मारण्याची धमकी! ‘ती’ पत्र मिळताच सौरव गांगुलीने थेट पोलीस स्टेशन गाठलं, धमकीमागे कोणाचा हात? खळबळजनक माहिती समोर/strong/a/p

📌 **महत्त्वाच्या घडामोडी**: • Duleep Trophy : सरफराज खान टीम इंडियात येताच मोठा ट्विस्ट; 25 वर्षांच्या खेळाडूचं नशीब एका रात्रीत पालटलं, संघात झाली निवड संदर्भात लेटेस्ट अपडेट समोर आले आहेत. • जाणून घ्या आजच्या ताज्या बातम्या व विशेष रिपोर्ट. 📖 **सविस्तर वृत्त**: आज Duleep Trophy : सरफराज खान टीम इंडियात येताच मोठा ट्विस्ट; 25 वर्षांच्या खेळाडूचं नशीब एका रात्रीत पालटलं, संघात झाली निवड विषयी महत्त्वाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी यावर भाष्य केले आहे. ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी टॉली न्यूज पाहत रहा.

