Gadchiroli Snake Bite Student Death: सळसळत आला, हळूहळू दंश करत सुटला; सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू, 3 जणांवर उपचार सुरु, गडचिरोलीतील आश्रमशाळेत मध्यरात्री काय घडलं?
pstrongGadchiroli Snake Bite Student Death: /strongगडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील जपतलाई निवासी आश्रम शाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू तर तीन विद्यार्थिनी जखमी असल्याची धक्कादायक घटना (Gadchiroli Snake Bite News) समोर आली आहे. या घटनेनंतर विद्यार्थिनींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, धानोरा रुग्णालयात उपचारादरम्यान इयत्ता सहावीतील दीपिका लकडा आणि इयत्ता आठवीतील सुष्मिता मंडल या दोन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. तर गडचिरोलीच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना इयत्ता दुसरीतील अनु कोरेटी हिचाही मृत्यू झाला./p h2नेमकं काय घडलं? (Gadchiroli Snake Bite Student Death)/h2 pदीपिका लकडा, सुष्मिता मंडल आणि अनु कोरेटी असे मृत्यू झालेल्या तीन विद्यार्थिनींची नावे आहेत. विद्यार्थिनी जेवणानंतर झोपलेले असताना रात्री दोन ते अडीच वाजताच्या सुमारास विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याची घटना समोर आली. दरम्यान, इयत्ता पाचवीतील दीपिका मदवी, सहावीतील कविता किरंगा आणि इयत्ता आठवीतील समृद्धी नैताम या तीन विद्यार्थिनींवर गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी समृद्धी सुरेश नैतम हिची प्रकृती गंभीर आहे./p h2सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी- (Gadchiroli Snake Bite Student Death)/h2 pa title="गडचिरोली" href=" data-type="interlinkingkeywords"गडचिरोली/aच्या धानोरा तालुक्यातील जपतलाई आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या धक्कादायक घटनेची आता उच्चस्तरीय चौकशी होणार आहे. आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक आणि a title="नागपूर" href=" data-type="interlinkingkeywords"नागपूर/aची पथके आज घटनास्थळी दाखल होऊन आश्रमशाळेची पाहणी करणार आहेत. विद्यार्थिनींच्या निवासाची व्यवस्था, सुरक्षेच्या उपाययोजना आणि व्यवस्थापनाकडून नियमांचे पालन झाले होते का, याची सखोल तपासणी केली जाणार आहे. दरम्यान, सर्पदंशानंतर उपचार घेत असलेल्या आणखी तीन विद्यार्थिनींना तातडीने अँटी व्हेनम देण्यात आले असून, त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे बारकाईने लक्ष आहे. चौकशीत निष्काळजीपणा किंवा सुरक्षाव्यवस्थेत त्रुटी आढळल्यास दोषी कोणताही असो, जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिलाय. दरम्यान या घटनेवर सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनीही तीव्र दुःख व्यक्त केला असून, उपचाराधीन विद्यार्थिनींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. मात्र आश्रमशाळेतील निष्पाप विद्यार्थिनींच्या सुरक्षेत नेमकी चूक कुठे झाली, तीन जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग का आली, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत./p h2 class="style-scope ytd-watch-metadata"सर्पदंश झाल्याने आश्रम शाळेतील तीन विद्यार्थिनींचा मृत्यू तर तीन गंभीर जखमी, VIDEO:/h2 piframe title="YouTube video player" src=" width="560" height="315" frameborder="0" allowfullscreen="allowfullscreen"/iframe/p h2संबंधित बातमी:/h2 p class="abp-article-title"stronga href=" Snake Bite Student Death: आश्रम शाळेतील 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू; गडचिरोतील धक्कादायक घटना, मध्यरात्री झोपल्यानंतर काय घडलं?/a/strong/p

📌 **महत्त्वाच्या घडामोडी**: • Gadchiroli Snake Bite Student Death: सळसळत आला, हळूहळू दंश करत सुटला; सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू, 3 जणांवर उपचार सुरु, गडचिरोलीतील आश्रमशाळेत मध्यरात्री काय घडलं? संदर्भात लेटेस्ट अपडेट समोर आले आहेत. • जाणून घ्या आजच्या ताज्या बातम्या व विशेष रिपोर्ट. 📖 **सविस्तर वृत्त**: आज Gadchiroli Snake Bite Student Death: सळसळत आला, हळूहळू दंश करत सुटला; सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू, 3 जणांवर उपचार सुरु, गडचिरोलीतील आश्रमशाळेत मध्यरात्री काय घडलं? विषयी महत्त्वाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी यावर भाष्य केले आहे. ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी टॉली न्यूज पाहत रहा.

