IND vs SL : शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
pstrongSri Lanka Cricket XI vs India 3-Day Warm-up Match :/strong भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेपूर्वी झालेल्या सराव सामन्यात एक भन्नाट नाट्य पाहायला मिळाले. गोलंदाजीने फलंदाजांची दाणादाण उडवणारा मोहम्मद सिराज यावेळी बॅटिंगमध्येही हिरो ठरला. सामन्याच्या अखेरच्या षटकात भारताला विजयासाठी 16 धावांची गरज असताना सिराजने सलग तीन षटकार ठोकत टीम इंडियाला थरारक विजय मिळवून दिला. सिराजची ही फटकेबाजी पाहून श्रीलंका इलेव्हनचे खेळाडूही अक्षरशः अवाक् झाले./p pstrongअखेरच्या षटकात 16 धावांची गरज (Team India win Warm-up Match)/strong/p pकोलंबो येथे भारत आणि श्रीलंका इलेव्हन यांच्यात तीन दिवसांचा सराव सामना खेळला गेला. सामन्याच्या तिसऱ्या आणि अखेरच्या दिवशी श्रीलंका इलेव्हनने आपला दुसरा डाव 200/6 धावांवर घोषित केला. पहिल्या डावात भारताला सहा धावांची पिछाडी होती. त्यामुळे सामना जिंकण्यासाठी टीम इंडियासमोर 207 धावांचे लक्ष्य होते. यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांनी भारताला तुफानी सुरुवात करून दिली. दोघांनी शतकी भागीदारी करत विजयाचा पाया रचला. मात्र सामना जसजसा शेवटाकडे गेला, तसतसा थरार वाढत गेला. भारताला विजयासाठी अखेरच्या षटकात 16 धावांची आवश्यकता होती. सामना अनिर्णित राहणार असे वाटत असतानाच मोहम्मद सिराजने संपूर्ण चित्रच बदलून टाकले./p pstrongसिराजची 'षटकारांची हॅट्ट्रिक'! (Mohammed Siraj hat-trick of sixes)/strong/p pभारताच्या डावातील अखेरचे षटक नुवंता टाकण्यासाठी आला. स्ट्राइकवर मोहम्मद सिराज होता. पहिल्याच चेंडूवर सिराजने आपला पाय बाजूला घेत काऊ कॉर्नरच्या दिशेने असा जबरदस्त षटकार ठोकला की मैदानावर उपस्थित सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. दुसरा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर फुल लेंथवर टाकण्यात आला. सिराजने यावेळीही अजिबात चूक केली नाही आणि पुन्हा एकदा चेंडू थेट सीमारेषेपलीकडे पाठवला. आता भारताला विजयासाठी फक्त चार धावांची गरज होती. तिसऱ्या चेंडूवर सिराजने मिडविकेटच्या वरून आणखी एक भन्नाट षटकार खेचला आणि भारताने 6 विकेट्सने सामना जिंकला. सिराजने अवघ्या 15 चेंडूंमध्ये 32 धावांची नाबाद धडाकेबाज खेळी केली. त्याच्या या खेळीत 4 षटकार आणि 1 चौकार होता./p blockquote class="twitter-tweet" p dir="ltr" lang="en"DSP GOES 6️⃣ 6️⃣ 6️⃣! 🔥 br /br /Mohammed Siraj signs off the warm-up game with three sixes on the trot! 💥 a href=" a href=" a href=" a href=" — Sony Sports Network (@SonySportsNetwk) a href=" 9, 2026/a/blockquote script src=" async="" charset="utf-8"/script pstrongसिराजची बॅट पाहून श्रीलंकेचे खेळाडूही हैराण (Sri Lanka players check Mohammed Siraj bat)/strong/p pसिराजच्या या धडाकेबाज फलंदाजीनंतर मैदानावर एक मजेशीर प्रसंग पाहायला मिळाला. सामना संपल्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करत असताना श्रीलंका इलेव्हनच्या काही खेळाडूंनी सिराजची बॅटच हातात घेतली. सिराजच्या बॅटची तपासणी करताना ते मस्करी करताना दिसले. या बॅटमध्ये एवढी ताकद आली कुठून? असा प्रश्नच जणू त्यांच्या चेहऱ्यावर होता. कारण सिराजने ज्या पद्धतीने षटकारांची आतषबाजी केली, ते पाहता तो वेगवान गोलंदाज नसून एखादा आक्रमक फलंदाजच आहे, असे वाटत होते./p pstrong15 ऑगस्टपासून भारत-श्रीलंका कसोटी मालिका/strong/p pया सराव सामन्यानंतर आता भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना 15 ऑगस्टपासून गॉल इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. यानंतर दुसरा कसोटी सामना 23 ऑगस्टपासून सिंहली स्पोर्ट्स क्लब स्टेडियमवर होईल. दोन्ही कसोटी सामने भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता सुरू होतील./p pstrongहे ही वाचा -/strong/p pstronga href=" Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी/a/strong/p

📌 **महत्त्वाच्या घडामोडी**: • IND vs SL : शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video संदर्भात लेटेस्ट अपडेट समोर आले आहेत. • जाणून घ्या आजच्या ताज्या बातम्या व विशेष रिपोर्ट. 📖 **सविस्तर वृत्त**: आज IND vs SL : शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video विषयी महत्त्वाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी यावर भाष्य केले आहे. ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी टॉली न्यूज पाहत रहा.

