tolee
India & National Affairs
Tolee NewsIndia & National Affairs

Kumar Sanu On Dawood Ibrahim Dubai Party: 'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...

p style="text-align: justify;"strongKumar Sanu On Dawood Ibrahim Dubai Party:/strong गायक कुमार सानू (Kumar Sanu) यांनी त्यांच्या कारकिर्दीतील एका फारशा माहीत नसलेल्या प्रसंगाबद्दल भाष्य केलंय. त्यांनी दुबईतील एका पार्टीत दुबईतल्या एका पार्टीचा किस्सा सांगितला. त्या पार्टीत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसुद्धा (Underworld Don Dawood Ibrahim) उपस्थित होता. आपण नेमके कुणाच्या पार्टीसाठी आलोय, याची आपल्याला कल्पनाच नसल्याचंही कुमार सानू (Singer Kumar Sanu) यांनी सांगितलं. त्यानंतर पार्टीचे फोटो न्यूजपेपरमध्ये पाहिले आणि त्यानंतर आपल्याला परिस्थितीचं गांभीर्य समजलं, असं गायकानं म्हटलंय. /p p style="text-align: justify;"'द लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना कुमार सानू यांनी दुबईत दाऊद इब्राहिमच्या पार्टीचा किस्सा सांगितला. तसेच, पोलिसांनी तिथे न जाण्याचा इशारा दिलेला असतानाही गँगस्टर अबू सालेमशी संबंधित एका पार्टीत परफॉर्म केल्याचा प्रसंग कुमार सानू यांनी सांगितला./p p style="text-align: justify;"strongकुमार सानू काय म्हणाले? (Kumar Sanu On Dawood Ibrahim)/strong/p p style="text-align: justify;"गायक कुमार सानू यांनी दाऊद इब्राहिमच्या पार्टीत गाण्याची आठवण सांगितली. ते म्हणाले की, संगीतकार नदीम त्यांना एका वाढदिवसाच्या पार्टीसाठी दुबईला घेऊन गेले होते. त्यांनी नमूद केलं की, त्यांना केवळ पार्टीत गाणं गायचंय, एवढंच सांगण्यात आलेलं आणि तिथे इतर कोण उपस्थित राहणार आहे, याची कोणतीही कल्पना त्यांना देण्यात आली नव्हती./p p style="text-align: justify;"कुमार सानू म्हणाले की, "मी एकदा दुबईत गाणं गाण्यासाठी गेलेलो. नदीम-जी मला तिथे घेऊन गेले होते. ती दाऊदच्या भावाच्या मुलीची किंवा त्याच्या स्वतःच्या मुलीची वाढदिवसाची पार्टी होती. तिथे मी आणि अनु मलिक होतो... दाऊद इब्राहिमही तिथे आलेला, तो अगदी माझ्या समोरच बसलेला... कार्यक्रमादरम्यान, उपस्थितांनी मला अशी गाणी गाण्याची विनंती केली, जी मी सहसा मंचावर गायचो..."/p p style="text-align: justify;"strongजेव्हा न्यूजपेपरमध्ये बातमी आली.../strong/p p style="text-align: justify;"दाऊद आलेल्या पार्टीत गायल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते फोटो न्यूजपेपरमध्ये झळकले. त्यावेळी आम्हाला जाणीव झाली की, नेमकं काय घडलंय. त्यावेळची आठवण सांगताना कुमार सानू यांनी सांगितलं की, "नंतर, जेव्हा माझा फोटो न्यूजपेपरमध्ये छापून आला, तेव्हा मला प्रश्न पडला की, 'मी हे काय केलं?' तेव्हा मी खूप घाबरलेलो..." /p p style="text-align: justify;"कुमार सानू यांनी पुढे बोलताना सांगितलं की, अबू सालेमच्या कार्यक्रमाबाबत पोलिसांनी त्यांना सावध केलं होतं. सानू यांनी आणखी एका घटनेची आठवण सांगितली, जिथे त्यांना गँगस्टर अबू सालेमशी संबंधित एका कार्यक्रमात सादरीकरण करण्यास सांगण्यात आलं होतं. त्यांनी सांगितलं की, एका व्यक्तीनं त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती, पण त्यांनी पैसे देण्यास नकार दिला आणि त्याऐवजी गाणं गाऊन मदत करण्याची तयारी दर्शवली... सानू म्हणाले की, "एका व्यक्तीचा फोन आला आणि त्यानं सांगितलं, 'आम्हाला इतके पैसे द्या...' मी उत्तर दिलं की, 'क्षमा करा, आम्ही पैसे देऊ शकणार नाही. जर काही काम असेल तर मला कळवा... तुम्हाला मी गाणं गावं असं वाटत असेल, तर मला सांगा..." मी एकदा अबू सालेमच्या कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी दुबईलाही गेलो होतो. यात घाबरण्यासारखे किंवा लपवण्यासारखे काहीही नाही..."/p p style="text-align: justify;"strongमहत्त्वाच्या इतर बातम्या :/strong/p p class="abp-article-title" style="text-align: justify;"stronga href=" Sherawat Claims Tom Cruise Has Crush On Her: 'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'/a/strong/p

S
Suman Kumar@suman_kumar
8/13/2026 | 3:24 pm 2 Min Read
Media 1
AI Generated Executive Summary

Latest updates on Kumar Sanu On Dawood Ibrahim Dubai Party: 'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले.... Read verified analysis on Tolee News.

📌 **महत्त्वाच्या घडामोडी**: • Kumar Sanu On Dawood Ibrahim Dubai Party: 'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले... संदर्भात लेटेस्ट अपडेट समोर आले आहेत. • जाणून घ्या आजच्या ताज्या बातम्या व विशेष रिपोर्ट. 📖 **सविस्तर वृत्त**: आज Kumar Sanu On Dawood Ibrahim Dubai Party: 'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले... विषयी महत्त्वाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी यावर भाष्य केले आहे. ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी टॉली न्यूज पाहत रहा.

t/
Published In Community ToleeAI Automation Society
0
U