Mahad Gas Leak : महाड एमआयडीसीत गॅस गळती; इंडो अमाईन्समधील दोघांचा मृत्यू, ३४ कामगारांची तब्येत बिघडली
महाड : रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीमध्ये इंडो अमाईन्स कंपनीमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिडमधून निघणाऱ्या गॅसची गळती झाली. या वायू गळतीमुळे अमित कुमार (२८, रा. बिहार) आणि कल्पेश वांद्रे या दोन कामगारांचा मृत्यू झाला. गॅस गळतीचा त्रास झाल्यामुळे ३४ कामगारांची तब्येत बिघडली. तब्येत खालावलेल्या कामगारांवर महाड आणि मुंबई येथील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. उपचार घेत असलेल्यांपैकी एका कामगाराची तब्येत जास्तच खालावली हे. त्याच्यावर वरिष्ठ डॉक्टरांच्या देखरेखीत उपचार सुरू आहेत. गॅस गळतीचा परिणाम कंपनीतील कामगारांसह परिसरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांनाही जाणवला. गॅसमुळे अनेकांना श्वसनाचा त्रास झाल्याची माहिती आहे. पावसामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाल्याचेही सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच फॅक्टरी इन्स्पेक्टर तांबोळी आणि महाडचे प्रभारी डीवायएसपी शशिकांत पवार यांनी सकाळी दहा वाजता कंपनीला भेट दिली. त्यांनी कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करून दुर्घटनेची माहिती घेतली. महाड औद्योगिक वसाहतीचे अधिकारीही घटनेचा तपास करीत असून, गॅस गळतीचे नेमके कारण आणि सुरक्षाव्यवस्थेतील संभाव्य त्रुटी याबाबत चौकशी सुरू आहे. महाड औद्योगिक वसाहतीत वारंवार गॅस गळतीच्या घटना घडत असल्याने कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कंपनीतील सुरक्षा उपाययोजनांची तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

📌 **महत्त्वाच्या घडामोडी**: • Mahad Gas Leak : महाड एमआयडीसीत गॅस गळती; इंडो अमाईन्समधील दोघांचा मृत्यू, ३४ कामगारांची तब्येत बिघडली संदर्भात लेटेस्ट अपडेट समोर आले आहेत. • जाणून घ्या आजच्या ताज्या बातम्या व विशेष रिपोर्ट. 📖 **सविस्तर वृत्त**: आज Mahad Gas Leak : महाड एमआयडीसीत गॅस गळती; इंडो अमाईन्समधील दोघांचा मृत्यू, ३४ कामगारांची तब्येत बिघडली विषयी महत्त्वाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी यावर भाष्य केले आहे. ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी टॉली न्यूज पाहत रहा.

