Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis: 'एकनाथ शिंदेंप्रमाणे फडणवीसांनीही आपली चूक मान्य करावी, पण ते आता...’; मनोज जरांगेंनी पुन्हा डागली तोफ
p style="text-align: justify;"strongManoj Jarange Patil on Devendra Fadnavis:/strong मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दिलेल्या नोंदी रद्द करणे ही आमची चूक होती, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मान्य करावे, अशी मागणी जरांगे यांनी केली. तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मंत्रिपदाचा गैरवापर केला हेही मान्य करावे, असं ते म्हणाले./p p style="text-align: justify;"पंढरपूर येथे माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यावर पुन्हा निशाणा साधला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपली चूक सुधारण्याची भूमिका घेतल्याचा दावा करत फडणवीस यांनीही त्याच पद्धतीने भूमिका घ्यावी, असं जरांगे यांनी म्हटलं./p h3 style="text-align: justify;"strongManoj Jarange Patil on Devendra Fadnavis: ‘एकनाथ शिंदेंप्रमाणे फडणवीसांनीही आपली चूक मान्य करावी’/strong/h3 p style="text-align: justify;"मनोज जरांगे म्हणाले की, “दिलेल्या नोंदी रद्द करणे ही आमची चूक होती, हे देवेंद्र फडणवीस यांनी मान्य करावे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिपदाचा गैरवापर केला हे त्यांनी मान्य करावे. ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत यांच्यामार्फत आपली झालेली चूक सुधारू, असे सांगितले, तशीच भूमिका फडणवीस का घेत नाहीत? त्यांना संपूर्ण समाजाचा रोष अंगावर घ्यायचा आहे का?, ” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. /p h3 style="text-align: justify;"strongManoj Jarange Patil on Devendra Fadnavis: ‘फडणवीस हे पहिले फडणवीस राहिले नाहीत’/strong/h3 p style="text-align: justify;"a title="देवेंद्र फडणवीस" href=" data-type="interlinkingkeywords"देवेंद्र फडणवीस/a यांच्यावर टीका करताना मनोज जरांगे म्हणाले, “फडणवीस हे पहिले फडणवीस राहिले नाहीत. गेले वर्षभर मी त्यांच्यावर कोणताही शब्द बोललो नाही. मात्र ते ओबीसीचे रक्त आहे असे सांगतात, म्हणजेच ते ओबीसीचे मुख्यमंत्री आहेत. पण, मराठा समाजावर अन्याय कशाला करता?, ” असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला./p h3 style="text-align: justify;"strongManoj Jarange Patil: 'यावेळी भुजबळ अन् धन्या मुंडेचे नाव घेतले का?'/strong/h3 p style="text-align: justify;"कुणबी प्रमाणपत्रे (Kunbi Certificates) आणि नोंदी रद्द करण्याच्या मुद्द्यावरूनही मनोज जरांगे यांनी चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय शिरसाट यांच्यावर आरोप केले. ते म्हणाले, “दाखले रद्द करण्यात बावनकुळे आणि संजय शिरसाट हे दोघे असून दोघांचीही पत्रे आमच्याकडे आहेत. मी पुराव्याशिवाय बोलत नाही. यावेळी मी एकदा तरी छगन भुजबळ आणि त्या धनंजय मुंडेचे नाव घेतले का? जरी माझा त्यांच्यावर राग असला तरी मी पुराव्याशिवाय कोणावरही आरोप करत नाही,” असा पुनरुच्चार जरांगे यांनी केला./p h3 style="text-align: justify;"strongManoj Jarange Patil on Sanjay Shirsat: ‘संजय शिरसाट यांना कळत नव्हते का?’/strong/h3 p style="text-align: justify;"संजय शिरसाट यांच्यावर टीका करताना जरांगे म्हणाले, “संजय शिरसाट यांना कळत नव्हते का, एकनाथ शिंदे आपले नेते असून ते आरक्षणासाठी एवढे प्रयत्न करतात. मात्र, आता a title="एकनाथ शिंदे" href=" data-type="interlinkingkeywords"एकनाथ शिंदे/a यांना चूक उमगली आहे. आता त्यांचे पीए, ओएसडी आणि उदय सामंत सारखे फोन करीत आहेत,” असाही टोला त्यांनी लगावला./p h3 style="text-align: justify;"strongManoj Jarange Patil: ‘मी कोणाचाही नसून फक्त मराठ्यांचा’/strong/h3 p style="text-align: justify;"आपल्या आंदोलनामागे कोणताही वैयक्तिक राजकीय हेतू नसल्याचं स्पष्ट करताना मनोज जरांगे म्हणाले, “मी कोणाचाही नसून मी फक्त मराठ्यांचा आहे. कुणाशीही संबंध वाढवण्यासाठी मी आंदोलने करत नाही. फडणवीस साहेब, तुम्ही गैरसमजात राहू नका. यांना बहुमताची मस्ती आहे, मात्र ही मस्ती आम्ही उतरवू, आता यांना सुट्टी नाही,” असा इशारा देखील जरांगे यांनी सरकारला दिला आहे. /p h3 style="text-align: justify;"strongराज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ/strong/h3 piframe title="YouTube video player" src=" width="560" height="315" frameborder="0" allowfullscreen="allowfullscreen"/iframe/p p style="text-align: justify;"strongआणखी वाचा /strong/p p class="abp-article-title" style="text-align: justify;"stronga href=" Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा/a/strong/p

📌 **महत्त्वाच्या घडामोडी**: • Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis: 'एकनाथ शिंदेंप्रमाणे फडणवीसांनीही आपली चूक मान्य करावी, पण ते आता...’; मनोज जरांगेंनी पुन्हा डागली तोफ संदर्भात लेटेस्ट अपडेट समोर आले आहेत. • जाणून घ्या आजच्या ताज्या बातम्या व विशेष रिपोर्ट. 📖 **सविस्तर वृत्त**: आज Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis: 'एकनाथ शिंदेंप्रमाणे फडणवीसांनीही आपली चूक मान्य करावी, पण ते आता...’; मनोज जरांगेंनी पुन्हा डागली तोफ विषयी महत्त्वाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी यावर भाष्य केले आहे. ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी टॉली न्यूज पाहत रहा.

