tolee
India & National Affairs
Tolee NewsIndia & National Affairs

Nashik Crime : आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार, प्रकरण दाबण्यासाठी आजीची हत्या ? जिल्ह्यात खळबळ

Nashik Crime News : सिन्नर तालुक्यातुन एक संतापजनक घटना समोर आली आहे. तालुक्यातील वावी परिसरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची खळबळजनक घडली असून याप्रकरणी पोलिस तपास सुरू आहे. धक्कादायक म्हणजे दाखल गुन्ह्याची तक्रार मागे घेण्यासाठी पीडितेच्या आजीचे अपहरण करण्यात आले आणि नंतर त्यांची हत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणाचे पडसाद साेमवारी नाशिक जिल्हा रुग्णालयासमाेर (Nashik Civil Hospital) उमटले. या घटनेच्या निषेधार्थ पीडितेच्या कुटुंबासह कुंभार समाज बांधवांनी सोमवारी नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाबाहेर आक्रमक होत रस्ता रोको आंदोलन केले. (Nashik Crime News) नेमकं प्रकरण काय ? कुटुंबियांच्या आरोपानुसार, सहा दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. याप्रकरणात संशयितांविरुद्ध दाखल तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे आंदाेलनकर्त्यांनी सांगितले. त्यानंतर तीन दिवसांपूर्वी पीडितेच्या आजीचे अपहरण करून, हात-पाय बांधून तिला विहिरीत फेकून खून केल्याचा आरोप कुंभार समाजाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. नवयुवक कुंभार समाज विकास संस्थेचे निलेश राऊत यांनी याबाबत प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली असून पाेक्सो कायदा, अपहरण आणि खुनाच्या गुन्ह्याअंतर्गत सर्व पसार संशयितांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली. (Nashik Crime News) प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा दरम्यान, पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली. जोपर्यंत आरोपींना कस्टडीत घेतले जात नाही, तोपर्यंत आजीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक [पवित्राच आंदोलनकर्त्यांनी घेतला. या घटनेमुळे त्र्यंबकराेडवर (Trimbak Road) अचानक धावपळ उडाली. सरकारवाडा पाेलिसांनी (Sarkarwada Police) धाव घेत पुढील कार्यवाही केली. यावेळी उपविभागीय पाेलीस अधिकारी कांतीलाल पाटील, वावीचे पाेलीस निरीक्षक आशिष शेळके व सरकारवाडा पाेलिसांनी आंदाेलनकर्त्यांची समजूत काढली.

S
Suman Kumar@suman_kumar
8/11/2026 | 6:56 pm 2 Min Read
Media 1
AI Generated Executive Summary

Latest updates on Nashik Crime : आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार, प्रकरण दाबण्यासाठी आजीची हत्या ? जिल्ह्यात खळबळ. Read verified analysis on Tolee News.

📌 **महत्त्वाच्या घडामोडी**: • Nashik Crime : आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार, प्रकरण दाबण्यासाठी आजीची हत्या ? जिल्ह्यात खळबळ संदर्भात लेटेस्ट अपडेट समोर आले आहेत. • जाणून घ्या आजच्या ताज्या बातम्या व विशेष रिपोर्ट. 📖 **सविस्तर वृत्त**: आज Nashik Crime : आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार, प्रकरण दाबण्यासाठी आजीची हत्या ? जिल्ह्यात खळबळ विषयी महत्त्वाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी यावर भाष्य केले आहे. ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी टॉली न्यूज पाहत रहा.

t/
Published In Community ToleeAI Automation Society
0
U