OTT Webseries: Netflix वर 6 एपिसोडच्या वेबसीरिजचा धुमाकूळ, रिलीज होताच नं -1 ला ट्रेंडिंग; देशभक्ती जागवणारा जबरदस्त थरार, Must Watch
p style="text-align: justify;"strongOTT Web Series:/strong दर आठवड्याला OTTवर काही ना काही नवीन रिलीज होत असतं. (OTT Release) या आठवड्यात Netflix वर एका बहुप्रतीक्षित वेब सीरिज (Web Series) रिलीज झालीय. या सीरिजच्या रिलीजची चाहते बऱ्याच दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते. OTT वर येताच 6 एपिसोडची ही नवी सीरिज सध्या धुमाकुळ घालतेय. रिलीज होताच ही सिरीज ट्रेंडिंगमध्ये थेट नंबर-1 वर गेलीय. चला जाणून घेऊया, नेमक्या कोणत्या वेब सिरीज बद्दल आपण बोलतोय ./p h3 style="text-align: justify;"Netflix वर नंबर-1 ठरली ही सीरिज/h3 p style="text-align: justify;"सिनेमागृहांव्यतिरिक्त Netflix वर चित्रपट आणि वेब सीरिज पाहणंही प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात आवडतं. नुकतीच या OTT प्लॅटफॉर्मवर अशीच एक वेब सीरिज रिलीज करण्यात आलीय. रिलीज होताच या सीरिजने दमदार कामगिरी करत नंबर-1चं स्थान मिळवलं आहे. या सीरिजचं नाव आहे ‘ऑपरेशन सफेद सागर’ (Operation Safed Sagar)./p p style="text-align: justify;"भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यांमध्ये 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धाची न सांगितलेली गोष्ट Netflixवरील या नव्या सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. 6 एपिसोडची ही वेब सीरिज भारतीय हवाई दलाचं शौर्य आणि पराक्रम दाखवणारी करते. यासोबतच देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांना देखील या सीरिजमधून आदरांजली वाहण्यात आली आहे.‘ऑपरेशन सफेद सागर’मध्ये जिमी शेरगिल, सिद्धार्थ, अभय वर्मा, दिया मिर्झा आणि महेश मांजरेकर यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसत आहेत. सध्या ही लेटेस्ट वेब सीरिज Netflix वर मस्ट वॉच ठरत असून, स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीची भावना जागवणारी परफेक्ट थ्रिलर म्हणूनही तिच्याकडे पाहिलं जात आहे. 7 ऑगस्ट रोजी ‘ऑपरेशन सफेद सागर’ Netflix वर रिलीज झाली. रिलीज होऊन दोन दिवस उलटल्यानंतरही ही सीरिज प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करताना दिसत आहे. समीक्षकांसोबतच प्रेक्षकांकडूनही ‘ऑपरेशन सफेद सागर’ला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे./p p style="text-align: justify;" /p piframe title="YouTube video player" src=" width="560" height="315" frameborder="0" allowfullscreen="allowfullscreen"/iframe/p

📌 **महत्त्वाच्या घडामोडी**: • OTT Webseries: Netflix वर 6 एपिसोडच्या वेबसीरिजचा धुमाकूळ, रिलीज होताच नं -1 ला ट्रेंडिंग; देशभक्ती जागवणारा जबरदस्त थरार, Must Watch संदर्भात लेटेस्ट अपडेट समोर आले आहेत. • जाणून घ्या आजच्या ताज्या बातम्या व विशेष रिपोर्ट. 📖 **सविस्तर वृत्त**: आज OTT Webseries: Netflix वर 6 एपिसोडच्या वेबसीरिजचा धुमाकूळ, रिलीज होताच नं -1 ला ट्रेंडिंग; देशभक्ती जागवणारा जबरदस्त थरार, Must Watch विषयी महत्त्वाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी यावर भाष्य केले आहे. ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी टॉली न्यूज पाहत रहा.

