tolee
India & National Affairs
Tolee NewsIndia & National Affairs

Pune Baramati Crime News: आई...अथर्वला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचेत; तरुणीचा आईला फोन आणि काही तासांत मृत्यू; आता मैत्रिणीने सांगितली अंगावर काटा आणणारी माहिती

pstrongPune Baramati Crime News: /strongपुण्याच्या बारामतीत 23 वार्षीय युवतीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी अथर्व नावाच्या तरुणाविरुद्ध गुन्हा (Baramati Pune News) दाखल झाला आहे. मृत्यूपूर्वी काही तास अगोदर संबंधित युवतीनेआपल्या आईला फोन करून, अथर्व तिला गोळी खाण्यास देणार असल्याचं सांगितल्याचा दावा तिच्या आईने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत केलाय. 6 ऑगस्ट रोजी ही महिला अथर्वसोबत बाहेर गेली होती. त्यानंतर रात्री तिची प्रकृती अचानक बिघडल्याचं सांगत तिला बारामतीतील विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर महिलेच्या आईने अथर्व राजेंद्र मेहन याच्यावर गंभीर संशय व्यक्त करत पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार बारामती शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 106(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. /p pविशेष म्हणजे, घटनेच्या काही दिवसांपूर्वी संबंधित महिला नेहमीपेक्षा शांत राहत असल्याचं तिच्या आईच्या लक्षात आलं होतं. तसेच अथर्वकडून तिला काही गोळ्या दिल्या जात असल्याची माहिती तिच्या मैत्रिणीने दिल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलंय. मात्र, महिलेच्या मृत्यूचं नेमकं कारण काय? तिला कोणतं औषध किंवा अन्य पदार्थ देण्यात आला होता का? आणि या सर्व घटनांचा मृत्यूशी काही संबंध आहे का? याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे. वैद्यकीय, रासायनिक, डिजिटल आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास केला जात असून, मृत्यूच्या निश्चित कारणाबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. या प्रकरणाचा तपास बारामती शहर पोलिसांकडून सुरू असून, पोलिसांच्या तपासानंतरच या महिलेच्या मृत्यूमागचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे./p h2शारीरिक संबंध, गोळी आणि आईला फोन- (Pune Baramati Crime News)/h2 pफिर्यादीच्या तक्रारीनुसार, घटना घडण्याच्या साधारण 15 ते 20 दिवस अगोदर मुलगी नेहमीपेक्षा शांत व गप्प राहत असल्याचे तिच्या आईच्या निदर्शनास आले. त्यामुळे आईने तिच्या मैत्रिणीकडे विचारणा केली असता, अथर्व हा सदर महिलेकडे वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आग्रह करीत असल्याचे तसेच तिला काही गोळ्या खाण्यास देत असल्याचे मैत्रिणीने सांगितल्याचा उल्लेख फिर्यादीने तक्रारीत केला आहे. दिनांक 06/08/2026 रोजी दुपारी सुमारे 12.30 वाजता अथर्व हा कार घेऊन सदर महिलेला एमबीए प्रवेशाच्या कामासाठी टी.सी. कॉलेज, बारामती येथे घेऊन गेला. त्याच दिवशी दुपारी सुमारे 4.00 वाजता तिने आईला मेसेज करून प्रवेश फीबाबत माहिती दिली. तसेच ती व अथर्व हे अथर्वची आई व मावशी यांना सोडण्यासाठी जात असल्याचे सांगितले. त्यानंतर आईने व्हिडिओ कॉल केला असता मुलगी अथर्वसोबत वाहनामध्ये असल्याचे दिसून आले आणि आईने तिला लवकर घरी परत येण्यास सांगितले. सायंकाळी सुमारे 7.00 वाजता फिर्यादीने मुलीला दोन वेळा फोन केला, मात्र तिने फोन न उचलल्यामुळे फिर्यादीने अथर्वच्या मोबाईलवर फोन केला. त्यावेळी फिर्यादीचे आपल्या मुलीशी बोलणे झाले. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, त्या संभाषणात मुलीने आईला सांगितले की, अथर्व तिला त्याच्या घरी घेऊन जाणार आहे. त्याला तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत. तसेच तो तिला गोळी खाण्यास देणार आहे. ही बाब ऐकल्यानंतर आईने तिला अथर्वच्या घरी जाऊ नये व तात्काळ घरी परत यावे, असे सांगितले./p h2संबंधित युवतीची आणि अथर्वची घरी विवाहसंदर्भात चर्चा- (Pune Crime News)/h2 pफिर्यादीच्या तक्रारीनुसार, तिच्या मुलीने बी.एससी. अॅग्रीचे शिक्षण पूर्ण केले होते आणि त्यानंतर ती एमपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी ऑक्टोबर 2025 पासून पुणे येथे क्लास करीत होती. डिसेंबर 2025 च्या अखेरीस तिच्या मैत्रिणीकडून फिर्यादीस मुलीचे अथर्व राजेंद्र मेहन, वय 27 वर्षे, व्यवसाय नोकरी, रा. गजानन अपार्टमेंट, हरिकृपानगर, मार्केट यार्ड समोर, इंदापूर रोड, बारामती, जि. पुणे याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर फिर्यादीने आपल्या मुलीशी फोन व व्हिडिओ कॉलद्वारे नियमित संपर्क ठेवण्यास सुरुवात केली. दिनांक 30/12/2025 रोजी फिर्यादी व तिचा भाऊ a title="पुणे" href=" data-type="interlinkingkeywords"पुणे/a येथे जाऊन तिला बारामती येथे घेऊन आले. त्यानंतर आईने विचारणा केली असता मुलीने अथर्वसोबत तिचे प्रेमसंबंध असल्याचे तसेच त्याच्यासोबत विवाह करण्याची इच्छा असल्याचे सांगितले. पुढे दोन्ही कुटुंबीयांमध्ये विवाहासंदर्भात चर्चा झाली आणि दिनांक 12/04/2026 रोजी मुलीचे कुटुंबीय अथर्वच्या बारामती येथील घरी गेले होते. दोन्ही कुटुंबीयांच्या संमतीने दोघांचा विवाह करण्याचे ठरले होते. त्यानंतर अथर्व व सदर महिला एकमेकांना भेटत होते तसेच फोनवर नियमित संपर्कात होते./p h2संबंधित युवतीच्या मैत्रिणकडूनणी मिळाली धक्कादायक माहिती- (Baramati Crime News)/h2 pअथर्वकडून तिला काही गोळ्या दिल्या जात असल्याची माहिती तिच्या मैत्रिणीकडून मिळाल्याचेही फिर्यादीने नमूद केले आहे. या सर्व घटनाक्रमामुळे फिर्यादीने आपल्या मुलीच्या मृत्यूबाबत अथर्व राजेंद्र मेहन याच्याविरुद्ध गंभीर संशय व्यक्त करून कायदेशीर तक्रार दिली आहे. त्यानुसार बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 325/2026, भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 106(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कलम हे सदोष मनुष्यवधाच्या स्वरूपात न येणाऱ्या अविचारी अथवा निष्काळजी कृत्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू घडविण्याच्या अपराधाशी संबंधित आहे. सदर प्रकरणात मृत्यूपूर्वी महिलेने आरोपी तिला गोळी खाण्यास देणार असल्याचे आईला सांगितल्याची बाब, यापूर्वीही आरोपीकडून काही गोळ्या दिल्या जात असल्याबाबतची फिर्यादीस मिळालेली माहिती तसेच आरोपीसोबत असताना महिलेची प्रकृती अचानक बिघडून तिचा मृत्यू झाल्याची परिस्थिती प्रथमदर्शनी समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर आरोपीकडून कोणते अविचारी अथवा निष्काळजी कृत्य झाले आहे किंवा कसे आणि त्याचा महिलेच्या मृत्यूशी कारणसंबंध आहे किंवा कसे, याबाबत सखोल तपास करण्यात येत आहे. मयत महिलेला प्रत्यक्षात कोणती गोळी, औषध अथवा अन्य पदार्थ देण्यात आला होता किंवा नाही, दिला असल्यास तो कोणता पदार्थ होता, त्याचे सेवन झाले किंवा कसे, त्याचा तिच्या प्रकृतीवर काय परिणाम झाला, तिच्या मृत्यूशी त्याचा कारणसंबंध आहे किंवा कसे तसेच मृत्यूचे निश्चित वैद्यकीय कारण काय आहे, या सर्व बाबींचा वैद्यकीय, रासायनिक, डिजिटल, तांत्रिक व इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. तपासाच्या सद्यस्थितीत महिलेच्या मृत्यूच्या निश्चित कारणाबाबत कोणताही अंतिम निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. सदर गुन्ह्याचा तपास मा. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, मा. अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम व पोलीस निरीक्षक शैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील हे करीत आहेत./p h2राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:/h2 piframe title="YouTube video player" src=" width="560" height="315" frameborder="0" allowfullscreen="allowfullscreen" data-mce-fragment="1"/iframe/p h2संबंधित बातमी:/h2 p class="abp-article-title"stronga href=" Baramati Crime News: अथर्वला शारीरिक संबंध ठेवायचेत, मला गोळी देतोय; मुलीचा आईला फोन, पुढच्या तासांत युवतीचा मृत्यू, बारामतीमधील हादरवून सोडणारी घटना/a/strong/p

S
Suman Kumar@suman_kumar
8/11/2026 | 7:00 pm 2 Min Read
Media 1
AI Generated Executive Summary

Latest updates on Pune Baramati Crime News: आई...अथर्वला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचेत; तरुणीचा आईला फोन आणि काही तासांत मृत्यू; आता मैत्रिणीने सांगितली अंगावर काटा आणणारी माहिती. Read verified analysis on Tolee News.

📌 **महत्त्वाच्या घडामोडी**: • Pune Baramati Crime News: आई...अथर्वला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचेत; तरुणीचा आईला फोन आणि काही तासांत मृत्यू; आता मैत्रिणीने सांगितली अंगावर काटा आणणारी माहिती संदर्भात लेटेस्ट अपडेट समोर आले आहेत. • जाणून घ्या आजच्या ताज्या बातम्या व विशेष रिपोर्ट. 📖 **सविस्तर वृत्त**: आज Pune Baramati Crime News: आई...अथर्वला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचेत; तरुणीचा आईला फोन आणि काही तासांत मृत्यू; आता मैत्रिणीने सांगितली अंगावर काटा आणणारी माहिती विषयी महत्त्वाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी यावर भाष्य केले आहे. ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी टॉली न्यूज पाहत रहा.

t/
Published In Community ToleeAI Automation Society
0
U