Strait Of Hormuz: होर्मुझमध्ये पुन्हा तणाव वाढला, इराणनं भारतीय टँकर माघारी धाडला; कॉरिडॉरवरुन हायव्होल्टेज ड्रामा
होर्मुझ सामुद्रधुनीत इराणनं भारतीय टँकरला माघारी धाडल्याने तणावाचे वातावरण तापले आहे, तर दुसरीकडे अमेरिका आणि इराणमधील शस्त्रसंधीच्या संपुष्टात आल्याने होर्मुझमधील वातावरण अधिकच तापलं आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीत हायव्होल्टेज घडामोडी सुरू झाल्या आहेत, ज्यामुळे भारतालाही फटका बसला आहे.

स्ट्रेट ऑफ होर्मुझ: होर्मुझमध्ये पुन्हा तणाव वाढला, इराणनं भारतीय टँकर माघारी धाडला; कॉरिडॉरवरुन हायव्होल्टेज ड्रामा अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता करार संपुष्टात आल्याने होर्मुझमधील वातावरण तापलं आहे. याचा फटका भारताला बसला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीत हायव्होल्टेज घडामोडी सुरू झाल्या आहेत. तेहरान: अमेरिकेनं इराण सोबतची शस्त्रसंधी गुंडाळत शांतता करार संपुष्टात आणताच होर्मुझच्या सामुद्रधुनीत तणाव वाढला आहे. इराणनं एक भारतीय टँकर माघारी धाडला आहे. इराणी सैन्यानं भारतीय टँकरला होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडू दिली नाही. याबद्दलची माहिती इराणची वृत्तसंस्था फार्सनं दिली आहे. होर्मुझमध्ये एका भारतीय टँकरवर हल्ला झाला आहे. हा टँकर भारताच्या दिशेनं येत होता. अमेरिकेनं इराणच्या बंदर अब्बासवर नुकतेच हल्ले केले आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं बहरीन आणि कुवेतमधील अमेरिकेच्या सैन्य तळांना लक्ष्य केलं आहे. या सगळ्याची परिणीती होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव वाढण्यात झाली आहे.

