Tukaram Mundhe FDA action on Pan Masala: तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई, अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफला एफडीएकडून नोटीस; पान मसाल्याच्या जाहिरातीवर कारवाई
p style="text-align: justify;"strongTukaram Mundhe FDA action on Pan Masala Ad:/strong एका पान मसाल्याच्या जाहिरातीच्या माध्यमातून एका बड्या कंपनीच्या तत्सम उत्पादनाची अप्रत्यक्ष जाहिरात केल्याचा आरोप करत महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अभिनेता अजय देवगण, शाहरुख खान ( आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. FDA च्या मते, बॉलीवूड अभिनेत्यांकडून करणाऱ्या येणाऱ्या जाहिरातीमधील उत्पादनाच्या ब्रँडचा संबंध प्रामुख्याने पान मसाल्याशी जोडला जात असल्याने ही जाहिरात सरोगेट जाहिरातीच्या स्वरूपाची असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे म्हणणे आहे./p p style="text-align: justify;"तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचा कारभार हाती घेतल्यापासून भेसळयुक्त आणि नागरिकांच्या आरोग्याला हानीकारक असलेले खाद्यपदार्थ, उत्पादने आणि हॉटेल्सवर कारवाई करण्याचा धडाका लावला आहे. जवळपास प्रत्येक दिवशी एफडीएच्या पथकांकडून राज्यातील कुठल्या ना कुठल्या भागात संबंधित आस्थापानांवर कारवाई करुन भेसळयुक्त माल पकडला जात आहे किंवा हॉटेल, डेअरी, दुकानात अस्वच्छता असल्याच्या कारणावरुन संबंधित आस्थापनांचे परवाने निलंबित केले जात आहेत. /p h3 style="text-align: justify;"तुकाराम मुंढे यांचा मोर्चा बॉलीवूड सेलिब्रिटींकडे/h3 p style="text-align: justify;"आतापर्यंत तुकाराम मुंढे यांच्या एफडीएच्या कारवाईचा फटका मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक नामांकित आस्थापनांना बसला आहे. तुकाराम मुंढे यांनी कितीही नावाजलेले हॉटेल किंवा ब्रँड असो, तिथे चुकीच्या गोष्टी आढळल्यास त्यांचे परवाने निलंबित करण्याची धमक दाखवली आहे. त्यानंतर आता तुकाराम मुंढे यांनी आता आपला मोर्चा बॉलीवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटींकडे वळवला आहे. अजय देवगण यांच्या जुहू येथील निवासस्थानी, शाहरुख खान यांच्या वांद्रे येथील ‘मन्नत’ निवासस्थानी, तर टायगर श्रॉफ यांना त्यांच्या Tiger Shroff Productions LLP या प्रॉडक्शन हाऊसमार्फत नोटीस बजावण्यात आली आहे. 13 जुलै 2026 रोजीच्या आदेशानुसार महाराष्ट्रात पान मसाल्याचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर एक वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर FDA ने तिन्ही अभिनेत्यांना जाहिरातीतील त्यांच्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. या नोटिसला आता अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ काय उत्तर देणार, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल./p p style="text-align: justify;"दरम्यान, a title="महाराष्ट्र" href=" data-type="interlinkingkeywords"महाराष्ट्र/a FDA कडून तंबाखू आणि निकोटीनयुक्त गुटखा-पान मसाल्याविरोधातील कारवाई तीव्र करण्यात आली असून, प्रतिबंधित उत्पादनांच्या संघटित नेटवर्कवर कारवाईसाठी पोलिसांच्या मदतीने MCOCA अंतर्गत कारवाईचीही तयारी सुरू आहे./p p style="text-align: justify;"strongMumbai Ganesh Utsav Prasad: मुंबईत उत्सवात वाटण्यात येणार्या प्रसादात रासायनिक पावडरचा वापर? नगरसेवक सचिन पाटील यांचे महापौरांना पत्र/strong/p p style="text-align: justify;"a title="मुंबई" href=" data-type="interlinkingkeywords"मुंबई/aतील बाजारपेठा, संकुले, मॉल्स, दुकाने आणि मंडईंमध्ये उत्सवांच्या काळात वाटण्यात येणाऱ्या प्रसादामध्ये ‘ऑरामाईन’ नावाच्या रासायनिक पावडरीचा वापर होत असल्याचा दावा नगरसेवक सचिन बाळकृष्ण पाटील यांनी केला आहे. या रसायनाचा वापर प्रामुख्याने पेपर, कापड आणि चामड्याच्या उद्योगांमध्ये केला जात असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे./p p style="text-align: justify;"या रसायनामुळे कॅन्सर, किडनी निकामी होणे आणि हृदयविकारासारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असल्याचा दावा करत, प्रसादासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांची तपासणी करून अहवाल येईपर्यंत अशा पदार्थांच्या वापरावर तातडीने बंदी घालावी, अशी मागणी पाटील यांनी महापौरांकडे केली आहे. तसेच या प्रकरणी राज्य शासनाकडे योग्य निवेदन सादवावे आणि अहवाल सादर करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे./p

📌 **महत्त्वाच्या घडामोडी**: • Tukaram Mundhe FDA action on Pan Masala: तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई, अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफला एफडीएकडून नोटीस; पान मसाल्याच्या जाहिरातीवर कारवाई संदर्भात लेटेस्ट अपडेट समोर आले आहेत. • जाणून घ्या आजच्या ताज्या बातम्या व विशेष रिपोर्ट. 📖 **सविस्तर वृत्त**: आज Tukaram Mundhe FDA action on Pan Masala: तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई, अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफला एफडीएकडून नोटीस; पान मसाल्याच्या जाहिरातीवर कारवाई विषयी महत्त्वाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी यावर भाष्य केले आहे. ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी टॉली न्यूज पाहत रहा.

